November 13, 2026 12:01 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » सार्वजनिक शांततेचा भंग : चाळीसगाव पोलिसानी काढली चौघांची धिंड !

सार्वजनिक शांततेचा भंग : चाळीसगाव पोलिसानी काढली चौघांची धिंड !

चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरातील वाढत्या गुंडगिरीवर अंकुश ठेवण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळत आहे. तर सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांची पोलीस निरीक्षकांनी धिंड काढली.

सविस्तर वृत्त असे की ,  शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी ऑपरेशन कोम्बिंग अंतर्गत पो. नि. मनेळ यांनी रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. अवैध शस्त्रांचीही जप्ती करण्यात आली आहे. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्यावर पोलिस अधिनियमातील संबंधित कलमानुसार कारवाई करून त्यांना समज देण्यात आली आहे. तर शुक्रवारी भीमनगर परिसरात झालेल्या हाणामारीत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या भावेश घनःश्याम गोयर, राज विनोद बकर, मयूर विनोद चव्हाण आणि अविनाश जगदीश गोयर (रा. मेहतरवाडा) यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर मेहतरवाडा ते चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यापर्यंत या सर्वांची धिंड काढण्यात आली. पोलिसांनी त्यांना पोलिसी हिसका दाखवत कायदेशीर कारवाई केली. या धडक मोहिमेत पीएसआय योगेश माळी, संदीप घुले यांच्यासह पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या कारवाईमुळे शहरातील गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबद्दल पो.नि. अमितकुमार मनेळ यांच्या शहरातून कौतुक होत असून सामान्य नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!