September 26, 2026 12:36 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » दुचाकीस्वाराने खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात : तरुणाचा मृत्यू

दुचाकीस्वाराने खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात : तरुणाचा मृत्यू

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील निरुळ येथील अशोक देविदास खैरे हे सासऱ्यांची दशक्रिया विधी आटोपून रावेरहून निरुळला जात होते. त्यांना बुऱ्हानपूरकडून येत असलेल्या दुचाकीस्वराने खड्डे चुकवण्याच्या नादात समोरून जबर धडक दिली होती. यात गंभीर झाल्यानंतर उपारार्थ रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खैरे हे दशक्रिया विधी आटोपून रावेरकडून निरूळला दुचाकी (एमएच-१९, ईआय- ४८१९) ने घरी परत येत होते. याच वेळी समोरून आलेल्या दुचाकी (एमपी-६८, एम- ४२५६) वरील चालक सोपान गजानन भोई (वय ४५) याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात अशोक देविदास खैरे (वय ३३) हे गंभीर जखमी झाले होते. या वेळी तेथे उपस्थित नागरिकांनी याबाबत रावेर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ अॅम्बुलन्स बोलावून खैरे यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथे रवाना केले. परंतु, रस्त्याने जात असतानाच अशोक खैरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रावेर तालुक्यात १८ जानेवारीला दुपारी १ वाजता घडली. या प्रकरणी रावेर पोलिसांत मध्य प्रदेशातील दुचाकीस्वार सोपान भोई याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!