Home » जळगाव » चौघांनी केली पाणीपुरी विक्रेत्याला जबर मारहाण !

चौघांनी केली पाणीपुरी विक्रेत्याला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी 

गांधी उद्यानाच्या गेटजवळ किरकोळ कारणावरून वाद होऊन चार जणांनी पाणीपुरी विक्रेत्याला आणि त्याच्या भावाला मारहाण केल्याची गंभीर घटना मंगळवारी, २ डिसेंबर रोजी घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि , विकास भागवत लिहेलकर (वय २७, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) आणि त्याचा भाऊ चेतन भागवत लिहेलकर हे दोघे गांधी उद्यानाच्या गेटसमोर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी बाजूला दुसरे दुकान लावणारा जगदीश लक्ष्मण लिहेलकर याने विकास लिहेलकर यांना ‘तू माझ्याकडे काय पाहतो?’ असा जाब विचारला. या क्षुल्लक कारणावरून जगदीश लक्ष्मण लिहेलकर याच्यासह यश जगदीश लिहेलकर, नीलेश विनोद लिहेलकर आणि दिनेश प्रवीण लिहेलकर (सर्व रा. जळगाव) या चार जणांनी विकास लिहेलकर आणि त्यांचा भाऊ चेतन लिहेलकर या दोघांना मारहाण केली. यावेळी संशयितांनी कांदा कापायच्या सुरीने विकास लिहेलकर यांच्या डोक्यावर आणि हातावर वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तकार दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *