Home » जळगाव » दारुच्या नशेत आईसह भावाला शिवीगाळ करत मारहाण

दारुच्या नशेत आईसह भावाला शिवीगाळ करत मारहाण

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील निमखेडी येथे दारूच्या नशेत येवून तरूणाच्या आईला व मुलाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील निमखेडी परिसरात कृष्णा प्रकाश बाविस्कर (वय ४०) हे आपल्या आई व मुलगा हिमांशु यांच्यासोबत वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांचा भाऊ गजानन प्रकाश बाविस्कर हा मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता दारूच्या नशेत येवून कृष्णा बाविस्कर यांची आई व मुलगा हिमांशू बाविस्कर यांना काहीही कारण नसतांना शिवीगाळ करत माहरण केली. आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कृष्ण बाविस्कर यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गजानन प्रकाश बाविस्कर रा. निमखेडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *