Home » महाराष्ट्र » लाडक्या बहिणींना दुहेरी हप्ता? डिसेंबरमध्ये ₹3000 जमा होण्याची शक्यता

लाडक्या बहिणींना दुहेरी हप्ता? डिसेंबरमध्ये ₹3000 जमा होण्याची शक्यता

मुंबई : वृत्तसंस्था

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस आनंदाची बातमी समोर येत आहे. डिसेंबर महिन्यात नेहमीप्रमाणे ₹1500 नव्हे, तर थेट ₹3000 सन्माननिधी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे निधी वितरणात विलंब झाला असावा, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. यापूर्वीही विधानसभा निवडणुकीच्या काळात सरकारने दोन महिन्यांची रक्कम एकत्र जमा केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यातच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. मात्र सरकारकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

‘ई-केवायसी’ सक्तीची

योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील निधी थांबवला जाऊ शकतो. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी: ladakibahin.maharashtra.gov.in

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *