Home » जळगाव » चोरट्यांची हिम्मत वाढली : थेट नायब तहसीलदारांची दुचाकी चोरली !

चोरट्यांची हिम्मत वाढली : थेट नायब तहसीलदारांची दुचाकी चोरली !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील विश्वधारा अपार्टमेंटमध्ये उभी ठेवलेली नायब तहसीलदार अभिमन्यू विलास चहाटे (वय ३८, रा. विश्वधारा अपार्टमेंट) यांची दुचाकी चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चहाटे हे ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी यावल येथून ड्यूटी करून घरी आले. त्यांनी आपली होंडा शाईन मोटारसायकल (एम.एच. २७ बीए ५४१७) अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरवरील पार्किंगमध्ये उभी केली. मात्र, दसऱ्या दिवशी ५ रोजी सकाळी ड्युटीसाठी खाली आल्यानंतर दुचाकी आढळून आली नाही. घटनेनंतर अपार्टमेंटमधील रहिवासी विवेक नरवाडे, चंद्रशेखर सोनवणे, अरुण पाटील यांनी परिसरात पाहणी केली. परंतु पार्किंग, अपार्टमेंट परिसर तसेच शहरातील विविध ठिकाणी शोध घेऊनही वाहनाचा थांगपत्ता लागला नाही. चोरीची खात्री झाल्यानंतर चहाटे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *