November 5, 2026 11:16 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » सिलेंडर स्फोटामुळे नाईट क्लबमध्ये भीषण आग : २५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

सिलेंडर स्फोटामुळे नाईट क्लबमध्ये भीषण आग : २५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

पणजी : वृत्तसंस्था

गोवा येथून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. हडफडे येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत किमान २५ जणांचा होरपळून तसेच गुदमरून मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिलांसह ४ पर्यटक, १४ क्लबचे कामगार व इतर ७ जणांचा समावेश आहे. सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून गोव्यातील आगीच्या घटनेची माहिती घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग क्लबच्या वरील बाजूस लागली. या क्लबला बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने आगीनंतर क्लबमध्ये असलेल्या पर्यटक तसेच कामगारांना बाहेर पडणे कठीण बनले. त्यानंतर आतमध्ये असलेल्या पर्यटक तसेच कामगारांची मोठी धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने व अग्निशमन पाण्याचे बंब गाडी रस्ता अरुंद असल्याने घटनास्थळी पोहचण्यास वेळ गेला. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली रात्री उशिरा ही आग आटोक्यात आली तरी २५ जणांचा मृत्यू झाला. मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात शव चिकित्सेसाठी पाठवण्यात आले आहेत व त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेथील पाहणी केली व पत्रकारांशी बोलताना त्यानी सांगितले की या नाईट क्लबकडे आवश्यक असलेले परवाने तसेच त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे त्यामुळे संबंधित नाईट क्लबच्या मालका विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. या नाईट क्लबला नियम धाब्यावर बसून जर परवाने देण्यात आले असतील तर संबंधिताविरुद्धही कारवाई केली जाईल अशी माहिती सावंत यांनी दिली.

घटनास्थळी आमदार मायकल लोबो या नीही भेट दिली व तेथील आगीची पाहणी केली व ते म्हणाले की दोन वर्षांपूर्वी या भागात बेकायदेशीरपणे नाईट क्लब सुरू असल्याची माहिती देऊन त्याची चौकशी करावी व त्यांच्या परवान्यांची तपासणी करावी अशी आपण मागणी केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडतात असे ते म्हणाले.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!