Home » महाराष्ट्र » मला मुलं हुशार नव्हे, दयाळू हवीत” : करीना कपूरची भावूक पोस्ट चर्चेत !

मला मुलं हुशार नव्हे, दयाळू हवीत” : करीना कपूरची भावूक पोस्ट चर्चेत !

मुंबई : वृत्तसंस्था

मनोरंजन जगतात नेहमीच स्वतःच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली करीना पालकत्वासंदर्भात अनेक पोस्ट शेअर करत असते. नुकतीच तिने मुलांसंबंधी एक विचारपूर्ण पोस्ट शेअर केली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

करिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, “मला माझी मुले फक्त हुशार असावीत असे नाही वाटत. मला ते दयाळू असावेत असे वाटते. कारण ग्रेड घसरतात, नोकऱ्या बदलतात, ट्रॉफी धूळ खातात… पण चारित्र्य? ते कायम आपल्या सोबत राहते.” या पोस्टला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून, सोशल मीडियावर तिच्या विचारांची चर्चा रंगली आहे.

करीनाच्या करिअरबाबत बोलायचे झाल्यास ती नुकतीच नेटफ्लिक्सवरील “डायनिंग विथ द कपूर्स” या माहितीपटात दिसली. कपूर कुटुंबावर आधारित या माहितीपटात कुटुंबातील नातेसंबंध आणि त्यांचे जीवन दाखविण्यात आले आहे. तसेच ती मेघना गुलजार दिग्दर्शित “दारा” या आगामी चित्रपटात दक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनसोबत झळकणार आहे. याशिवाय तिचे काही नवीन प्रोजेक्ट्सही सुरू असल्याची माहिती असून, त्यांच्या अधिकृत घोषणांची प्रतीक्षा आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *