Home » जळगाव » संतापजनक : मदतीच्या बहाण्याने शेतात बोलावून तरुणीचा विनयभंग !

संतापजनक : मदतीच्या बहाण्याने शेतात बोलावून तरुणीचा विनयभंग !

जळगाव :  प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावाजवळ दि. ५ डिसेंबर रोजी बकऱ्या चारण्यासाठी जात असलेल्या तरुणीला मदतीच्या बहाण्याने शेतात बोलवून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी विनयभंग करणाऱ्या हरि गोरख बारी (रा. शिरसोली, ता. जळगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुणी बकऱ्या चारण्यासाठी जात असताना हरि बारी याने तिला फवारणी पंप उचलण्याच्या बहाण्याने शेतात बोलविले. त्यावेळी तरुणी मदत करीत असताना त्याने तिच्याशी गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला व शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली. याविषयी कोणाला काही सांगितल्यास तुला मारून टाकेल, अशी धमकीही तिला देण्यात आली. या प्रकरणी तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हरि बारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *