Home » जळगाव » बसस्थानकातील गर्दीत ५० हजारांचे पाकिट चोरीला ; सराईत जेरबंद !

बसस्थानकातील गर्दीत ५० हजारांचे पाकिट चोरीला ; सराईत जेरबंद !

जळगाव : प्रतिनिधी 

बसचमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत मोहम्मद सिद्दीकी नूर मोहम्मद मोमीन (वय ६९, रा. धरणगाव) यांच्या पॅन्टच्या खिशातून ५० हजार रुपये चोरणारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नाजिम कदिर पटवे उर्फ नाजिम तरकारी (रा. गेंदालाल मिल) याला स्थानिक गुन्हे जेरबंद केले.

सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील मोहम्मद सिद्दीकी नूर मोहम्मद मोमीन हे चोपडा बस स्थानकातून चोपडा ते धरणगाव बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या खिशातून ५० हजारांची रोकड काढून घेतली होती. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून संशयितांचा शोध सुरु असतांना ही चोरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील पाकीट मार नाजिम कदीर पटवे याने केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, विष्णू बिऱ्हाडे, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, राहूल रगडे, रविंद्र कापडणे यांचे पथक रवाना केले.

पथकाने रोकड चोरणाऱ्या संशयित नाजिम कदिर पटवे उर्फ नाजिम तरकारी (रा. गेंदालाल मिल) याला काही तासातच ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक केलेल्या नाजीमवर यापुर्वी जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *