Home » जळगाव » कत्तलीचा विरोध केला आणि हल्ला झाला : जळगावात दोन तरुण गंभीर जखमी !

कत्तलीचा विरोध केला आणि हल्ला झाला : जळगावात दोन तरुण गंभीर जखमी !

जळगाव : प्रतिनिधी

चोपडा तालुक्यातील लोणी येथे गोवंश कत्तलीच्या माहितीवरून गेलेल्या काही तरुणांवर स्थानिक कसाई लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जामनेर येथील कृष्णा भिल (वय १८) आणि योगेश महाराज कोळी (वय ३५ रा. जळगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा भील याला माहिती मिळाली की, चोपडा तालुक्यातील लोणी गावात गोवंश कत्तल सुरू आहे त्यावरून कृष्णा भिल, योगेश महाराज कोळी आणि आणखी तीन ते चार जण हे लोणी गावात गेले. त्या ठिकाणी त्यांनी गोवंश कत्तलीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कसाई लोकांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

तसेच काहीजण चॉपर, कोयते आणि लोखंडे दांडे घेऊन धावले. आणि योगेशच्या मांडीवर चॉपरने वार केले. तसेच योगेश महाराज कोळी यांनाही मारहाण करण्यात आली आहे. जखमींना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयामध्ये सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून पोलीस घटनेची माहिती घेत आहेत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *