November 12, 2026 10:42 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात
लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात
Home » महाराष्ट्र » चाळीसगावचा किल्ला सर : भाजपचा झंझावात, विरोधकांची धूळधाण

चाळीसगावचा किल्ला सर : भाजपचा झंझावात, विरोधकांची धूळधाण

चाळीसगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव नगरपालिकेवर भाजपने दणदणीत बहुमत मिळवत सत्ता प्रस्थापित केली आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी शहर विकास आघाडीच्या पद्मजा राजीव देशमुख यांचा तब्बल ६,०१२ मतांनी पराभव करत विजयाची पताका फडकावली. एकूण ३६ पैकी २४ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, शहर विकास आघाडीला १० जागांवर समाधान मानावे लागले, तर दोन अपक्षांनीही विजय नोंदवला आहे.

रविवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळी १० वाजता अगोदर टपाली मतदानाची मोजणी झाली. एकूण १६ टेबलवर ७२ कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.

विजयानंतर जल्लोष करताना नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण आणि भाजपाच्या कार्यकर्त्यां. प्रतिभा चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेतली. मतमोजणीच्या एकूण नऊ फेऱ्या झाल्या. एका फेरीत दोन प्रभागांतील मतमोजणी झाली. नवव्या फेरी अखेर प्रतिभा चव्हाण यांना ३२२३८, तर शविआच्या पद्मजा देशमुख यांना २६२२६ मते आम आदमी पार्टीचे अँड. राहुल जाधव यांना ४३४, तर राष्ट्रवादीचे (अजित पवार) समाधान पाटील यांना ३५३ मते मिळाली.

प्रभाग क्रमांक १ (अ): करणसिंग राजपूत (भाजप) २२४६, प्रभाग १ (ब): मनीषा पाटील (भाजप) २२६६, प्रभाग २ (अ): राहुल मस्के (शहर विकास आघाडी) १३८०, प्रभाग क्र. २ (ब): वैशाली मोरे (शहर विकास आघाडी) १५३७, प्रभाग ३ (अ) मधून दीपक पाटील (शहर विकास आघाडी) १२६१, प्रभाग ३ (ब): स्वाती शिरुडे (भाजप) १७१६, प्रभाग ४(अ) : हर्षल चौधरी (भाजप) २२८६, प्रभाग क्र. ४(ब): प्राजक्ता कोठावदे (भाजप) १८५७. प्रभाग ५ (अ): रूपाली चौधरी (भाजप) २६२०, प्रभाग ५ (ब): युवराज जाधव (भाजप) १७७८, प्रभाग ६(अ) योगेश खंडेलवाल (भाजप) १६३८, प्रभाग ६ (ब): योजना पाटील (भाजप) १४९०, प्रभाग ७ (अ) स्वाती राखुंडे (शहर विकास आघाडी) २०३५, प्रभाग ७(ब): राजेंद्र चौधरी (अपक्ष), १४२८. प्रभाग ८ (अ) पायल कारडा (भाजप) १०९६, प्रभाग ८ (ब) सोमसिंग राजपूत (भाजपा) १६७५. प्रभाग क्र. ९ (अ) विजया पवार (शहर विकास आघाडी) १४४२. प्रभाग २ (ब) पूनम अहिरे (शहर विकास आघाडी) १६४०, प्रभाग क्र. १० (अ): भारती मराठे (भाजपा) १५७२, प्रभाग १० (ब): संभाजी गवळी (भाजपा) १३६८, प्रभाग ११ (अ) हर्षदा बाळू पवार (भाजपा) १९१६. प्रभाग ११ (ब): अभय वाघ (भाजप) १४३७, प्रभाग १२ (अ) अनिल चौधरी (भाजपा) २०८१, प्रभाग १२ (ब) सायली जाधव (अपक्ष) २३६७, प्रभाग १३ (अ) फकिरा बेग जमाल बेग मिर्झा (भाजपा) २३५०, प्रभाग १३ (ब): मेघा चौधरी (भाजपा) १८९८, प्रभाग १४(अ): शेख इमरान शब्बीर (शहर विकास आघाडी) २००६, प्रभाग १४ (ब): रुचीना खान (भाजपा) १९६५. प्रभाग १५ (अ) शेख वसीम रज्जाक (भाजपा) १३१०, प्रभाग १५ (ब): नलिनी चौधरी (भाजपा) १६६४, प्रभाग १६ (अ): अभिषेक राजीव देशमुख (शहर विकास आघाडी) १८२१, प्रभाग १६(ब) मधून राजश्री राजपूत (शहर विकास आघाडी) १८०६, प्रभाग १७ (अ) उज्ज्वला राजपूत (भाजपा) १६३०, प्रभाग १७ (ब): प्रशांत कुमावत (भाजपा) २१०६, प्रभाग १८ (अ): धर्मा बच्चे (भाजपा) ७९२. प्रभाग १८ (ब) सविता ठाकूर (शहर विकास आघाडी) ११३६

विजयी झालेल्या ३६ नगरसेवकांमध्ये ३० चेहरे नवखे असून, यात सर्वाधिक भाजपच्या उमेदवारांचा समावेश आहे. सहा माजी नगरसेवकांनी पुन्हा कमबॅक केले आहे. यात राजेंद्र चौधरी व सायली रोशन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी करीत विजयश्री खेचून आणला. १३ माजी नगरसेवकांना मतदारांनी या निवडणुकीत नाकारले

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!