Home » जळगाव » चाळीसगाव : पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक, चौघांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगाव : पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक, चौघांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगाव : प्रतिनिधी

नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारामुळे आपला पराभव झाल्याच्या रागातून त्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक करणाऱ्या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ३मधील आपल्या पक्षाचा उमेदवार अपक्ष उमेदवारामुळे समजातून अपक्ष उमेदवार राकेश भीमराव बोरसे यांच्या स्वामी विवेकानंद कॉलनीमधील घरावर दगडफेक करून मोठमोठ्याने शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने बोरसे यांचे कुटुंबामध्ये घबराट निर्माण झाली आहे. ही घटना २१ रोजी दुपारी २.४५ वाजता घडली. नगरसेवकपदावर नितीन पाटील हे निवडून येणारे उमेदवार होते, तुम्ही अपक्ष का उभा राहिला? तुमच्यामुळे नितीन पाटील यांचा पराभव झाल्याचे सांगत या चौघांनी बोरसे यांच्या घरावर दगडफेक करत काचा फोडून नुकसान केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिवराज पाटील, रोहित चौधरी, अजय राजपूत, नीलेश चौधरी यांच्यासह इतरांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३५१ (२), ३५१ (३), ३५२, ३२४(४) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *