Home » जळगाव » धक्कादायक : ४० वर्षीय प्रौढाने आयुष्य संपविले !

धक्कादायक : ४० वर्षीय प्रौढाने आयुष्य संपविले !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील चिचोली गावातील तरूणाने गावातील पाण्याच्या टाकीजवळ गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना गुरूवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नाना अशोक पाटील वय ४० रा. चिंचोली ता. जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

नाना पाटील हा तरूण चिंचोली गावात आपल्या परिवारासह राहत होता. गुरूवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिंचोली गावातील पाण्याच्या टाकीजवळ त्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हा प्रकार गावातील सागर नाळकर व ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्याला तातडीने खाली उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गफुर तडवी हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *