Home » राष्ट्रीय » ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे तीन राज्यांपर्यंत; राजस्थान–गुजरात–मध्य प्रदेशातून एमडी ड्रग्सचा पुरवठा !

ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे तीन राज्यांपर्यंत; राजस्थान–गुजरात–मध्य प्रदेशातून एमडी ड्रग्सचा पुरवठा !

जळगाव : प्रतिनिधी

ड्रग्स प्रकरणात पोलिस कोठडीत असलेला ड्रग्स पेडलर शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी हा राजस्थान, गुजरातच्या सीमा भागासह मध्य प्रदेशातून ड्रग्स आणून त्याची विक्री करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्यांचादेखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

शाहू नगरात शहर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. याप्रकरणात दहा महिन्यांपासून पसार असलेला शेख अबरार शेख मुक्तार याला २४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आल्यानंतर तो पोलिस कोठडीत आहे. यानंतर पोलिस तपासाचा वेग वाढवला आहे. मालेगाव येथे झालेल्या कारवाईमध्ये अबरार जिलानीसह अरबाज खान मेहमूद खान उर्फ गबा (रा. मास्टर कॉलनी) हा पसार झाला होता मालेगाव पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्यालादेखील जळगाव पोलिसांकडून ड्रग्सच्या गुन्ह्यात चौकशीसाठी अटक केली जाणार आहे.

सुरत येथे झालेल्या कारवाईत इम्रान खाटीक यालादेखील अटक केली होती. त्यालादेखील पोलिसांकडून ताब्यात घेणार आहे. चौकशीदरम्यान त्याने हे ड्रग्स राजस्थान व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातून आणि मध्य प्रदेशातून आणल्याचे पोलिसांना सांगितले. तपासाचे धागेदोरे तीन राज्यांपर्यंत पोहोचल्यामुळे आता पोलिसांकडून तेथील ड्रग्स माफियांचा शोध घेतला जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *