Home » राष्ट्रीय » जळगाव मनपात भाजपमध्ये नाराजी; अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकिटे कापली

जळगाव मनपात भाजपमध्ये नाराजी; अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकिटे कापली

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करताना अनेक निष्ठावंत व जुने कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांची तिकिटे कापल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. अनेक प्रभागांमध्ये पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर दिल्याचे जाहीरपणे सांगितले जात असले, तरी यामुळे जुने आणि अनुभवी कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. काही प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराजी अधिक तीव्र झाली आहे. पक्षाच्या निर्णयामुळे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमात असून काही ठिकाणी बंडखोरीचीही शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप नेतृत्वाकडून अद्याप नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी ठोस प्रयत्न झाल्याचे चित्र दिसत नाही. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांमध्ये तीव्र असंतोष असून काही जण अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या अंतर्गत नाराजीचा फटका भाजपच्या निवडणूक गणितावर काय परिणाम करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *