जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ (ड) मधून अपक्ष उमेदवार पाटील सुनील ज्ञानेश्वर यांनी विकासकेंद्री व सकारात्मक प्रचाराला सुरुवात केली आहे.
“नव्या नेतृत्वाचा नवा संकल्प” या घोषवाक्याखाली मतदारांशी संवाद साधताना सुनील पाटील यांनी राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर जनसेवा आणि समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. एक जागरूक नागरिक म्हणून प्रभागातील नागरिकांच्या समस्या, दैनंदिन अडचणी आणि मूलभूत प्रश्नांची सखोल जाण असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा, महिलांसाठी सुरक्षित व सशक्त वातावरण, युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला विशेष भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. पारदर्शक, प्रामाणिक व निःस्वार्थ कार्यपद्धतीतून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सुनील पाटील हे थेट जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवत असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. मतदारांनी बॅट (Bat) या निवडणूक चिन्हावर मतदान करून सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रभाग क्रमांक ११ (ड) मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उतरणाऱ्या सुनील पाटील यांच्या विकासाभिमुख भूमिकेमुळे मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून त्यांची उमेदवारी लक्षवेधी ठरत आहे.
Author: K P Chavan
thepubliclive



