Home » जळगाव » चाळीसगाव » चाळीसगावमध्ये हृदयद्रावक घटना; १३ वर्षीय विद्यार्थिनीचा बळी

चाळीसगावमध्ये हृदयद्रावक घटना; १३ वर्षीय विद्यार्थिनीचा बळी

चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील बसस्थानकात एस.टी. महामंडळाच्या बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे परिसरात शोककळा पसरली आहे.

वडगाव लांबे येथील आठवीत शिक्षण घेणारी माधुरी शिवाजी मोरे (वय १३) ही विद्यार्थिनी १७ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानक परिसरात उभी होती. याच वेळी एस.टी. महामंडळाची बस (क्रमांक २२१९) तिच्या पायावरून गेली. या भीषण अपघातात माधुरी गंभीर जखमी झाली होती.

अपघातानंतर तिला तत्काळ चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी तिला धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार  सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वडगाव लांबे व चाळीसगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातानंतर तातडीची वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून एस.टी. महामंडळाच्या संबंधित चालक व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडगाव लांबे येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यासोबतच बसस्थानक परिसरात प्रवासी व विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *