मुंबई : वृत्तसंस्था
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या रस्सीखेचीत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पाठिंब्याने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, या समीकरणात भाजप बाजूला पडल्याचे चित्र आहे. खुद्द खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने ५३ जागांवर विजय मिळवला आहे. तर मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मिळून ९ नगरसेवक आहेत. या दोन्ही गटांचा एकत्रित आकडा ६२ वर जात असल्याने सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमत सहज गाठले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. मनसेने आधीच शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, कोकण भवनात खासदार श्रीकांत शिंदे, मनसे नेते राजू पाटील आणि आमदार नरेश म्हस्के यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीत मनसे शिवसेनेला पाठिंबा देत आहे आणि आम्ही सर्वजण मिळून सत्ता स्थापन करणार आहोत. तसेच, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्यास ते स्वागतार्ह ठरेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
भाजपबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “भाजप आणि आमच्यात कोणतीही चढाओढ नाही. आम्ही एकत्र सत्ता स्थापन करत आहोत. लवकरच महापौर आणि उपमहापौर कोणाचा असेल, हे स्पष्ट होईल.” विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, मनसे नेते राजू पाटील आमचे मित्र आहेत, ते पाठिंबा देत असतील तर त्यात गैर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या राजकीय उलथापालथीनंतर आता मुंबई महापालिकेतही वेगळी खेळी होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, मुंबईत युतीचाच महापौर बसेल आणि त्यात शिवसेनेचा महापौर नसेल, तर कुणालाच ते आवडणार नाही. राजकारणात काहीही घडू शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांची भूमिका काय राहणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



