जळगाव : प्रतिनिधी
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन कंजरभाट समाज समाजमंदिर येथे उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. नथ्थु रायचंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत *“भारत माता की जय” व “वंदे मातरम्” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला तर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमास समाजाचे उपाध्यक्ष बिरजू नेतलेकर, विजय दहियेकर, राकेश तमायचे, मोहन चव्हाण, फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर यांच्यासह नरेश बागडे, विजय अभंगे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, वीर दहियेकर, संदीप बागडे, गणेश बागडे, सुमित माछरे, गोपाल बाटूंगे, विनोद माछरेकर, राज नेतले, पंकज नेतलेकर, व प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचे
मुख्याध्यपक बी,एस बाविस्कर सर व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्यध्यपिका नंदा पाटील मॅडम संजयसिंग पाटील विद्यालयाचे शिक्षक,शिक्षिका कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते. यांनी परिश्रम केले राकेश भाट,गोविंदा रायचंदे, जितू नेतले,अंकुश माछरे,नितीन बागडे, गौरव रायचंदे, घनश्याम बागडे, अनुराग रायचंदे, प्रितेश बागडे,आयन बागडे,मोनू रायचंदे तसेच महिला भगिनी यशोदा गागडे, संगीता रायचंदे,रोहिणी गुमाने आदी पदाधिकारी, युवक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी देशाची एकता, संविधान व लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बागडे यांनी केले तर आभार उमेश माछरेकर यांनी मानले



