बारामती : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आता अजित पवारांच्या बारामतीतील फार्महाऊसवरून समोर आलेली माहिती मनाला चटका लावणारी ठरत आहे. फार्महाऊसवरील व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी अजित पवारांच्या आईंशी संबंधित हृदयद्रावक प्रसंग उघड केला आहे.

संपत धायगुडे यांनी सांगितले की, सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे अजितदादांच्या आई फार्महाऊसवर टीव्ही पाहत होत्या. आम्ही त्यांच्यासाठी नाश्त्याची तयारी करत होतो. दरम्यान सकाळी साडेआठच्या सुमारास टीव्हीवर अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी झळकू लागली. ते पाहताच आईंनी लगेच विचारले, “अरे, दादांचा अपघात झालाय का?” मात्र, त्यांनाही सुरुवातीला असेच वाटत होते की दादांना थोडीफार खरचटली असेल, फार काही झाले नसेल.
पुढे टीव्हीवर बारामतीत दादांना रुग्णालयात आणल्याची बातमी झळकू लागली. ही माहिती आईंपर्यंत पोहोचू नये म्हणून आम्ही तातडीने बंगल्यावरील टीव्हीची केबल काढून टाकली आणि टीव्ही बंद पडल्याचे सांगितले. त्यांचा मोबाईलही फ्लाइट मोडवर ठेवण्यात आला. “काही झालेले नाही,” असे सांगत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता.
मात्र, दादांना भेटायला जाऊया, असे म्हणत त्या फार्महाऊसच्या बाहेर चालतच निघाल्या. ड्रायव्हरने गाडी बंद पडल्याचे सांगितले, तरीही त्या थांबायला तयार नव्हत्या. अखेर नाईलाजाने त्यांना बारामती येथील बंगल्यावर घेऊन जावे लागले, अशी माहिती संपत धायगुडे यांनी दिली.
दरम्यान, अजित पवार यांनी अवघ्या चार दिवसांपूर्वीच फार्महाऊसवर येऊन आईची भेट घेतली होती. शनिवारी सकाळी साडेसात वाजता ते फार्महाऊसवर आले होते. आईसोबत त्यांनी जवळपास पाऊण तास मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर शेतातील कामगारांना कामाच्या सूचना दिल्या, नव्या वृक्षारोपणाबाबत मार्गदर्शन केले आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची आपुलकीने विचारपूस केली. पुढील कार्यक्रमासाठी निघताना त्यांनी सर्वांना काळजी घ्यायला सांगितले होते. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने केवळ महाराष्ट्राचे कणखर नेतृत्वच हरपले नाही, तर आईचा आधारवड, कुटुंबाचा कणा आणि कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक कायमचा निखळला आहे. या दुर्दैवी घटनेने राज्यभर शोककळा पसरली असून, प्रत्येक डोळा पाणावलेला आहे.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



