Home » जळगाव » अमळनेर » मध्यरात्री भीषण आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

मध्यरात्री भीषण आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

अमळनेर : प्रतिनिधी


शहरातील कसाली मोहल्ल्यात दिनांक ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप गंभीर असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आणि स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फिरोज पठाण, नासीर हाजी, नवीद शेख, नाना धनगर, गुलाम नबी, इमरान शेख, अरमान हलवाई, वसीम पठाण, तय्यब पठाण, रिजवान मनियार, नईम पठाण, छोटू भोई व सुपडू मणियार यांनी तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. अरुंद रस्ते व धुराचे लोट अशा प्रतिकूल परिस्थितीतही अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर पाण्याचा मारा केला. नागरिकांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत तसेच गर्दी नियंत्रित ठेवून सहकार्य केले. परिणामी आग आसपासच्या घरांपर्यंत पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी संबंधित घरांचे मोठे नुकसान झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *