Home » जळगाव » धरणगावात आढळलेल्या इराणी महिलेची भारतातून हकालपट्टी

धरणगावात आढळलेल्या इराणी महिलेची भारतातून हकालपट्टी

धरणगाव : प्रतिनिधी

धरणगाव फरनाज हमीद रेझा येथे बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या (३८) हिची अखेर भारतातून हकालपट्टी करण्यात येत असून तिला फेब्रुवारी रोजी जळगावातून दिल्लीला नेण्यात येणार आहे.

त्यानंतर ६ रोजी विमानाने तिला इराणमध्ये पाठविण्यात येईल. धरणगाव येथील कुरेशी मोहल्ल्यात एक वर्षापासून इराणी महिला मुलासह वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जळगावातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आली. इराण दूतावासाने महिलेला परत सकारत्मकता बोलविण्याविषयी दर्शविली. त्यानुसार आता या महिलेची ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथून विमानाने इराणला रवानगी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ५ फेब्रुवारी रोजी तिला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जळगावातून दिल्लीला घेऊन जाणार आहे.

सदर महिलेला इराणमध्ये पाठविण्यासाठी जळगाव पोलिस दलाने तयारी सुरू केली. मात्र सदर महिलेला केवळ फारसी व थोडीफार इंग्रजी भाषा येत असल्याने माहिती घेताना पोलिसांना अडचण येत होती. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकाऱ्यांनी ट्रान्सलेटरचा आधार घेत सदर महिलेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर तिला परत पाठविण्यासाठी इराण दूतावासाशी संपर्क साधून माहिती दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *