जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य घरफोडी टोळीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत मध्यप्रदेशातील दोन सराईत आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेले १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील आयोध्या नगर भागात राहणारे फिर्यादी पंढरीनाथ पाटील हे कुटुंबासह गावी धानवड येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात घरफोडी केली. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर पाटील यांनी घरी येऊन पाहणी केली असता लाकडी कपाट फोडलेले व त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, पोकॉ विशाल कोळी यांचे विशेष पथक नेमण्यात आले. पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत थेट मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पुनासा तालुक्यातील इनपुन पुनर्विकास परिसरात सापळा रचला. दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांनी शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुखदेव रामसिंग टाक (वय ३६) व आकाश दिनेश वाघे (वय १९) (रा. इनपुन पुनर्विकास, ता. पुनासा, जि. खंडवा, मध्यप्रदेश) अशी असून त्यांच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालकही सहभागी होता.
आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले सुमारे ४ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन, तसेच लोखंडी पकड (पेंचिस), स्क्रू-ड्रायव्हर व चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी व पोकॉ योगेश घुगे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



