Home » जळगाव » भुसावळ » शेअर मार्केटच्या जाळ्यात अडकवून तरुणीची १० लाखांची फसवणूक

शेअर मार्केटच्या जाळ्यात अडकवून तरुणीची १० लाखांची फसवणूक

भुसावळ : प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका २७ वर्षीय तरुणीची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणुकीनंतर संबंधित तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत तिचा पाठलाग व विनयभंग केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित सिद्धांत मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सिद्धांत हेडा याने तरुणीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे सांगून तिच्या डिमॅट अकाउंटची माहिती मिळवली. त्यानंतर त्या खात्यातून तसेच तिच्या क्रेडिट कार्डचा वापर करून आरोपीने सुमारे १० लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आर्थिक फसवणूक केल्यानंतर आरोपीने तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिने नकार दिल्यानंतर आरोपीने मुंबई ते मंगलोर या प्रवासादरम्यान तिचा पाठलाग करत विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलिस करत असून, आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *