जळगाव : प्रतिनिधी
सोबत फिरायला चल असे सांगून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सुरत येथे नेऊन तिच्यावर राहुल रमेश राठोड (वय २५, रा. पिंप्राळा) याने अत्याचार केला. हा प्रकार दि. ३० जानेवारी रोजी उघडकीस आला. या प्रकरणी ३ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातीलच राहुल राठोड याने फिरायला जायच्या बहाण्याने दि. २९ जानेवारी रोजी सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले. त्याठिकाणी दि. ३० जानेवारी रोजी रात्री त्याने मुलीवर अत्याचार केला. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पीडित मुलीने जळगावात आल्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानरून बलात्कार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक भूषण कोते करीत आहेत.



