Home » जळगाव » चाळीसगाव » घरगुती वादाचा भीषण शेवट; चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरात खून !

घरगुती वादाचा भीषण शेवट; चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरात खून !

चाळीसगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील दरेगाव लोंढे येथील उसतोड मजूर महिलेचा पतीने कोयत्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर परिसरात घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी आरोपी पतीला अवघ्या २ तासांत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव लोंढे येथील भानुदास आनंदा वाघ (वय ४५) हा पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ (वय ३५) व दोन मुलांसह पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर परिसरात ऊसतोड कामासाठी वास्तव्यास होता. गेल्या १० दिवसांपासून सोयरी कॉलेजच्या पाठीमागील परिसरात जळगाव जिल्ह्यातील तीन ते चार ऊसतोड टोळ्या काम करत होत्या. दरम्यान, या पती-पत्नीत घरगुती कारणातून सतत वाद होत असल्याने भानुदास वाघ हा तणावात होता. मंगळवारी रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून मंगळवारी रात्री जवळपास १२ वाजेच्या सुमारास भानुदास वाघ याने ऊस तोडीचा कोयता घेऊन पत्नी लक्ष्मीच्या मानेवर व गळ्यावर वार करून तिचा खून केला.

दरम्यान, या घटनेची माहिती डायल ११२ वर मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. टी. वाय. मुजावर यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, स.पो.नि. विभावरी रेळेकर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, भारत भोसले व सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या फडातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भानुदास वाघ याच्याविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *