September 27, 2026 3:24 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » प्रोफेसर कॉलनीतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची कार चोरी

प्रोफेसर कॉलनीतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची कार चोरी

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. ३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  प्रदीप जगतसिंग पाटील (वय ६१, रा. प्रोफेसर कॉलनी) असे कार चोरी झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची एमएच-१९ डीव्ही ७७९० क्रमांकाची कार घरासमोर उभी असताना अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. दुसऱ्या दिवशी सकाळी कार दिसून न आल्याने पाटील यांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे चौकशी करून कारचा शोध घेतला. मात्र कार सापडली नाही. अखेर दि. ७ रोजी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ मिलिंद सोनवणे करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!