झेलम एक्सप्रेसमध्ये बॅग चोरी; एलसीबीने घेतले दोघांना ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी दिनांक ०८/०२/२०२६ रोजी आनंद मोर्या, रा. अयोध्या, झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान त्यांची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. या बॅगेत १,६५,०००/- रुपये किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने होते. सदर प्रकरणाची तक्रार आनंद मोर्यांनी इटारसी रेल्वे पोलीसात दाखल केली होती, जी भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली. तक्रारीवरून […]
महाराष्ट्र बारावी परीक्षा १० फेब्रुवारीपासून; १५.३ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची मुख्य परीक्षा १० फेब्रुवारीपासून राज्यभर सुरू होत आहे. यंदा विक्रमी १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ३,३८७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी आज पत्रकार परिषदेत परीक्षा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि ‘पेपर […]
भाजपला धक्का : शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे गटाला मोठे धक्के

मुंबई : वृत्तसंस्था सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद गट निवडणुकांत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटातून त्यांचे निकटवर्तीय अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला असून शिवसेनेच्या कविता ओंबळे यांनी विजय मिळवला आहे. या गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा […]
जळगाव जिल्ह्यात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये विविध सांस्कृतिक, शैक्षणिक […]
शरद पवार यांची तब्येत खालावली; राज्यातील राजकारणात खळबळ !

बारामती : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार असून, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले जाणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची प्रकृती काहीशी ढासळली होती. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते आणि सार्वजनिक […]
पोलिस उपनिरीक्षकांच्या घरावर पेट्रोल ओतून आग; सीसीटीव्हीत दोन संशयित कैद !

चाळीसगाव : प्रतिनिधी नगरदेवळा येथील राऊळ गल्लीत रात्री २.३० ते ३ वाजेच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल ओतून जाळपोळी करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने घरातील महिलांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक माहितीनुसार, दोन अज्ञात इसम नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून घटनास्थळी आले होते. लोखंडी गेट ओलांडून ते […]
दोन भीषण अपघात, दोन कुटुंबांचा उद्ध्वस्त झाले जीवन !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था रविवारचा दिवस छत्रपती संभाजीनगरसाठी ‘ब्लॅक संडे’ ठरला. शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांनी दोन हसती-खेळती कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त केले. नारेगावच्या अजीज कॉलनीतील शहबाज कमरोद्दीन बागवान (३१) सकाळी सुमारे १०:३० वाजता मोपेडवरून कामावर निघाला होता. भरधाव ट्रकने त्याला पाठीमागून धडक दिली, ज्यामुळे शहबाज रस्त्यावर फेकला गेला आणि डोक्याला गंभीर इजा होऊन […]
दुचाकी अपघातात जखमी व्यक्तीचा पाच दिवसांनी मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने जात असताना झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रतन वसंत गायकवाड (वय ५१, रा. दापोरा, ता. जळगाव) यांचा उपचार सुरू असताना दि. ७ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दापोरा येथील रहिवासी असलेले रतन गायकवाड हे दि. २ रोजी सायंकाळी […]
प्रोफेसर कॉलनीतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची कार चोरी

जळगाव : प्रतिनिधी शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. ३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप जगतसिंग पाटील (वय ६१, रा. प्रोफेसर कॉलनी) असे कार चोरी झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची एमएच-१९ डीव्ही ७७९० क्रमांकाची […]
मित्रांसमोरच तरुण बुडाला; दीड तासांनी मृतदेह सापडला !

जळगाव : प्रतिनिधी मित्रांसोबत कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या आशुतोष दिलीप जोशी (वय २२, रा. गणेश नगर) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. मासेमारी करणाऱ्यांसह पट्टीच्या पोहणाऱ्यांनी दीड तास शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील […]