Home » जळगाव » घराशेजारील मंडप ठरला मृत्यूचा साक्षीदार; तरुणाची आत्महत्या

घराशेजारील मंडप ठरला मृत्यूचा साक्षीदार; तरुणाची आत्महत्या

जळगाव : प्रतिनिधी

घराशेजारी कार्यक्रम असल्यामुळे मंडप टाकलेला होता. त्या मंडपाच्या दोरीला गळफास घेत रियाज जोहबा तडवी (वय १९, मूळ रा. लोहारा, ता. रावेर, ह. मु. सुप्रिम कॉलनी) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  रावेर तालुक्यातील लोहारा येथील रियाज जोहबा तडवी हा तरुण कुटुंबियांसह सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास आला होता. मजूरी काम करुन कुटुंबाला हातभार लावित होता. त्यांच्या घराशेजारी कार्यक्रम असल्याने घराजवळ मंडप टाकलेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास रियाज तडवी याने मंडपाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. रियाज याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *