Home » राष्ट्रीय » महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार !

महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार !

मुंबई : वृत्तसंस्था

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज प्रथमच मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्रीपदाचा विधिवत कार्यभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या मंत्रालयातील आगमनावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मंत्र्यांनी जोरदार स्वागत केले.

कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयातील दादांच्या केबिनमध्ये प्रतिमेला अभिवादन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या. यावेळी पार्थ पवारही भावना आवरू शकले नाहीत. उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले होते. संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते.

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज पदभार स्वीकारत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय जोडला. हा दिवस राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या ऐतिहासिक प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, युवक तसेच वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या प्रगतीसाठी पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यभार स्वीकारताना उपस्थित मान्यवर, वरिष्ठ अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सुनेत्रा पवार यांचा हा प्रवास राज्यातील महिला नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरणार असून, महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *