Home » महाराष्ट्र » मुंबई महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी; बिनविरोध निवडणूक !

मुंबई महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी; बिनविरोध निवडणूक !

मुंबई: वृत्तसंस्था

मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीची आज औपचारिकता पार पडली. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका रितू राजेश तावडे यांची महापौरपदी, तर सत्ताधारी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक संजय घाडी यांची उपमहापौरपदी नियुक्ती झाली. महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांनी दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिकेत विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडीनंतर दोघांनी तत्काळ पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे स्वागत करत त्यांना अभिनंदन केले आणि त्यांच्या अनुभव व कार्यक्षमतेची दखल घेतली. त्यांनी म्हटले, “महायुतीने मुंबईच्या विकासाला चालना दिली असून मुंबईकरांनी त्यावर विश्वास ठेवला.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर व उपमहापौरांना कामासाठी मदतीची हमी दिली आणि महापालिका ही लोकशाहीचे महत्त्वाचे अंग असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाने लोकांना अधिक जवळ वाटेल. मुंबई महापालिकेत आता विकासाचा अजेंडा महापौर व उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्यात येईल.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *