September 24, 2026 12:26 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » जळगाव बसस्थानकातून ६० हजारांची सोनसाखळी लांबविली !

जळगाव बसस्थानकातून ६० हजारांची सोनसाखळी लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी

नवीन बसस्थानक परिसरातून एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली असून, चोरट्याने सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरली आहे. यासंदर्भात अखेर २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जामनेर येथील कल्पना सुनील लखोटे (वय ५९, रा. माळी गल्ली, जामनेर) या आपल्या कामासाठी जळगाव शहरात आल्या होत्या. त्यांचे खासगी काम संपल्यानंतर त्या २४ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आल्या होत्या. त्याच वेळी, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची सोनसाखळी तोडून पळ काढला

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!