जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ येथील गायत्री नगरमधून १५ लाखांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी मोठा मुद्देमाल शिरपूर येथे एका खाजगी गोदामात लपवला होता. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ तालुका पोलिसांच्या मदतीने हा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. किंमत १८ लाख ८० हजार रुपये असून, यात फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आणि एलईडी टीव्ही असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि. १५ जून रोजी मध्यरात्री नंदलाल मिलकीराम मकडीया यांच्या गायत्री नगर येथील राजस्थान मार्बलच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या गोदामाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी गोदामात प्रवेश केला. (केसीएन)त्यांनी गोदामातून एकूण ३५ हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्यात फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आणि एलईडी टीव्ही चोरून नेल्या होत्या.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या पथकांनी समांतर तपास सुरू केला. चोरी झालेल्या मालाच्या ठिकाणाबाबत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीची खात्री केली असता, सदरचा मुद्देमाल शिरपूर शहरातील करवंद रोड, महावीर लॉन्स येथील एका खाजगी पत्र्याच्या गोदामात ठेवलेला असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच, गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल ज्या खाजगी गोदामात ठेवण्यात आला होता, त्याचे मालक मुजावर जामील शेख चांद (वय ४८, रा. न्यु बोराडी ता. शिरपूर, ह.मु. गणेश कॉलनी आर सी पटेल उर्दू शाळे जवळ शिरपूर) आणि जफर शेख मुजावर (वय २४, रा. मुजावर मोहल्ला शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळचे कृष्णात पिंगळे, स्था गु शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यांनी केली कारवाई
उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळचे उमाकांत पाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो हे कॉ विजय नेरकर, पो हे कॉ संदीप धनगर, पो शि सचिन चौधरी, पो शि प्रशांत परदेशी, पो शि योगेश माळी, पो शि अमर अढाळे, पो शि प्रशांत सोनार, पो शि भूषण चौधरी, पो शि राहुल वानखेडे, पो शि जावेद शहा, स्था गु शाखा पथक पो उप निरी शेखर डोमाळे,(केसीएन)सहा फौज रवी नरवाडे, पो हे कॉ गोपाळ गव्हाळे, पो हे कॉ मुरलीधर धरगर, पो हे कॉ संदीप चव्हाण, पो हे कॉ प्रविण भालेराव, चालक भरत पाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो हे कॉ महेश चौधरी, पो शि राहुल भोई यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल टि वाघ, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



