जळगाव : प्रतिनिधी
जळगाव – भुसावळ महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळील महामार्गांवर दोन ट्रकची जोरदार धडक झाल्याने या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा चालक हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला.

सविस्तर वृत्त असे कि, ओडिशा पासिंगचा ट्रक (क्रमांक ओडी 15 सी.2963) व राजस्थान पासिंगचा ट्रक (क्रमांक आर.जी.14 जेटी 0421) यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर एका ट्रकमधील चालक कॅबिनमध्ये अडकल्याने दोरीच्या सहाय्याने ओढून त्याला बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
दुसर्या ट्रकचा चालक गंभीर जखमी असून त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली आहे. त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर एमआयडीसी पोलिस व वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातस्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



