जळगाव : भाजपचे माजी नेते तसेच राष्ट्रवादीचे एकनाथराव खडसे यांचा काही दिवसापूर्वी त्यांच्या मुक्ताईनगर येथील कोथळी गावी त्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. हा कार्यक्रम पक्षविरहित ठेवला जरी असला तरी त्यांचे भाजपचे पूर्वीचे सहकारी मित्र तसेच जिल्ह्यातील व राज्यातील सर्व राजकीय नेते व आमदारांना त्यांनी निमंत्रण दिले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस यांचे अनेक नेते कार्यक्रमास आले परंतु भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांचे एकही नेते व आमदार झाल्याने महायुतीच्या नेत्यांनी खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याची दिसून आले.
महाराष्ट्रात भाजप वाढविण्यात भाजपची दिवंगत येथे प्रमोद महाजन तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर कोणी नेते असेल तर ते एकनाथराव खडसे होते असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमृत महोत्सव कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. तसेच अन्य नेत्यांनी देखील खडसे यांच्या कार्याचा व राजकीय कामांचा कौतुक केले.

भाजपच्या नेत्यांनी फिरवली पाठ?
एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या जन्म उत्सवाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे सर्वांनाच आमंत्रण दिले होते. तसेच हा कार्यक्रम पक्षविरहित असल्याचे देखील त्यांनी जाहीर केल्या होते. त्यासाठी सर्वांना आमंत्रण देण्यापासून व त्यांचे जाहिरातीवर फोटो देखील लावण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला महायुतीच्या घटकातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी लावली नाही आहे. यात त्यांची जवळचे केंद्रातील मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे हे देखील आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील येण्याची चर्चा होती मात्र ते देखील आले नाही. केवळ भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील एक दिवस अगोदर येऊन त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
भाजपचे एकही नेते आल्याने याची दुःख- खडसे
खडसे यांचा बुधवारी वाढदिवस असल्यामुळे कोथळी येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये खडसे बोलताना म्हणाले की भाजपातील काही नेते आले नाहीत याचे दुःख आहे. चाळीस वर्षे भाजपासाठी काम केले त्यामुळे हे नेते येथील अशी अपेक्षा होती मात्र ते आले नाहीत याचे दुःख आणि खंत आहे असे खडसे यांनी भावना व्यक्त केला.
कार्यकर्त्यांचा विरोध नाही मात्र काही नेत्यांचा विरोध आहे
भाजप मध्ये 40 वर्ष काम केले असून उत्तर महाराष्ट्र मध्ये व महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी केलेले कार्यामध्ये अनेक कार्यकर्ते व लोक माझ्यासोबत जोडले गेले. त्यांचे आजही माझ्यावर प्रेम आहे. मात्र काही नेत्यांचा विरोध आहे त्यामुळेच ते आले नसावे. मात्र जनतेची सेवा ही अशीच करत राहील.
Author: K P Chavan
thepubliclive


