जळगाव : खानदेशातील क्रिकेट विश्वात आपल्या दमदार आवाजाने आणि अनोख्या समालोचन शैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक पद्माकर पाटील उर्फ “पॅडी” यांची यंदाच्या Congo Premier League स्पर्धेसाठी समालोचक म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी त्यांचा हा सलग पाचवा आफ्रिका दौरा ठरत असून, जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
सध्या Central Africa मधील KINSHASA येथे सुरू असलेल्या Congo Premier League स्पर्धेत ते आपल्या खास शैलीत समालोचन करत असून, त्यांच्या आवाजाची जादू आता थेट आफ्रिकेपर्यंत पोहोचत आहे. खानदेशातील क्रिकेट खेळाडूंना आणि स्थानिक क्रिकेट स्पर्धांना आपल्या समालोचनातून नवी ओळख मिळवून देण्यात पॅडी यांचे मोठे योगदान राहिले आहे.
क्रिकेट मैदानावरील प्रत्येक क्षण जिवंत करण्याची कला, खेळाडूंचे अचूक विश्लेषण आणि प्रेक्षकांना सामन्यात गुंतवून ठेवणारी त्यांची शैली यामुळे त्यांनी क्रिकेटप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
जळगाव जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या पद्माकर पाटील यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“जळगावचा बुलंद आवाज आता आफ्रिकेत गुंजतोय,” अशी भावना क्रिकेटप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
जळगावचे क्रिकेट समालोचक पद्माकर पाटील यांची Congo Premier League साठी निवड | पाचव्यांदा आफ्रिका दौरा

Author: K P Chavan
thepubliclive
Latest News
The specified slider is trashed.
“भुसावळात बांगलादेशी महिला अटकेत! बनावट भारतीय पासपोर्टसह मोठा खुलासा”
जळगावचे क्रिकेट समालोचक पद्माकर पाटील यांची Congo Premier League साठी निवड | पाचव्यांदा आफ्रिका दौरा
“मनपाचा उल्लेखच नाही!” भंगाळे गोल्डविरोधात ॲड. पियुष पाटील यांची तक्रार