September 21, 2026 7:40 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

२६ वर्षीय बांधकाम कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील मोंढाळा रोडवर झालेल्या अपघातात २६ वर्षीय बांधकाम कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. तर हा अपघात नसुन घातपात झाल्याचा संशय मयताचा भाऊ याने व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील बहिरम नगर येथील रहिवासी हर्षल बाबुलाल तडवी (वय – २६ वर्ष) या तरुणाचा मोंढाळे […]

दारूची नशा चढली अन पतीने पत्नीला संपविले !

वरणगाव :  प्रतिनिधी दारूच्या नशेत पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना वरणगावजवळील विल्हाळा शिवारात उघडकीस आली आहे. ही घटना रविवार (२३ मार्च) रोजी भल्या पहाटे समोर आली असून आरोपी पती अजीज सलीम शेख (वय ३३) हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. विल्हाळा शिवारातील गट क्र. ६५१ मध्ये किशोर पाटील (रा. सुसरी) यांच्या मालकीच्या विटभट्टीवर […]

राज ठाकरेंचा मोठा निर्णय : मनसेची जबाबदारी ‘या’ व्यक्तीकडे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सर्वच पक्षांनी आता स्थानिक निवडणुकीसाठी कंबर कसली असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईत पार पडलेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यानुसार, मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर देण्यात आली आहे. मुंबईतील विभाग अध्यक्षांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्यात […]

‘त्या’ अपघातातील रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ शनिवार दि. २२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावरुन जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रकचालकाने ट्रकवरिल नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरुन रिव्र्व्हस येणाऱ्या ट्रकने उड्डाणपुलाशेजारी उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना चिरडले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. […]

जस्टिस वर्मा यांच्या घरात सापडल्या गोण्यांमध्ये जळालेल्या नोटा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला लागलेली आग आणि रोख रक्कम मिळाल्याच्या प्रकरणात एक नवीन वळण आलं आहे. मुख्य न्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांच्या आदेशावरुन जस्टिस वर्मा यांच्या घरातील आतील फोटो आणि व्हिडिओ जारी करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये जस्टिस वर्मा यांच्या घराच्या आत जळालेल्या नोटांचे बंडल दिसत आहेत, तसच या प्रकरणाशी […]

केंद्र सरकारने दिली राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने […]

युवराज कोळी खून प्रकरणी : पोलिसांनी दोन भावांना केली अटक

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कानसवाडा-शेळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (वय ३८, रा. कानसवाडा) यांच्या खूनप्रकरणी परेश उर्फ सोन्या भरत पाटील (वय २६) व देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील (वय २४, दोघ रा. शेळगाव, ता. जळगाव) या दोघं भावांना नशिराबाद पोलिसांनी अटक केली. मात्र या दोघांचा बाप भरत भास्कर पाटील हा पसार असून […]

कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील वडगाव कडे येथे खरिपाच्या हंगामात उत्पन्न चांगले न आल्याने कर्जाचा डोंगर कसा फेडावा या विवंचनेत सातगाव येथील शेतकरी समाधान महादु महाले (वय ३५) या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात जाऊन विष प्राशन करत जीवनयात्रा संपवली आहे. आपला पती घरी येत नाही म्हणून शेतात बघण्यासाठी काहींना पाठवले. त्यावेळी समाधान महाले औषध घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने […]

दारु पिण्यास पैसे न दिल्याने दूध संघाच्या सुरक्षा रक्षकाच्या कॅबीनमध्ये तोडफोड !

जळगाव : प्रतिनिधी सुरक्षा अधिकाऱ्याने दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून जिल्हा दूध संघातील सुरक्षा रक्षक कॅबिनमध्ये घुसून आकाश राजू खरे (वय २८, रा. पिंप्राळा हुडको) याने तोडफोड केली. ही घटना दि. २० मार्च रोजी रात्री घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा दूध संघात सुरक्षा […]

या राशीतील लोकांनी हाडे, पोटदुखी आणि डोळ्यांशी संबंधित आजारांपासून सावध राहा !

आजचे राशिभविष्य दि.२३ मार्च २०२५ मेष राशी नोकरीत बढतीचे योग येतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या आवडीचे काम करायला मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना रोजगार मिळेल. व्यवसायात मनापासून काम करा आणि तुम्हाला यश मिळेल. राजकारणातील महत्त्वाच्या मोहिमेची कमान तुम्हाला मिळू शकते. वृषभ राशी आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य लाभाचा असेल. पैशाच्या व्यवहारात आवश्यक ती […]

error: Content is protected !!