November 6, 2026 11:00 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » राज ठाकरेंचा मोठा निर्णय : मनसेची जबाबदारी ‘या’ व्यक्तीकडे !

राज ठाकरेंचा मोठा निर्णय : मनसेची जबाबदारी ‘या’ व्यक्तीकडे !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील सर्वच पक्षांनी आता स्थानिक निवडणुकीसाठी कंबर कसली असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईत पार पडलेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.

त्यानुसार, मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर देण्यात आली आहे. मुंबईतील विभाग अध्यक्षांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी मुंबई अध्यक्षावर असणार आहे.

मनसेने आतापर्यंत मुंबईसाठी कधीही अध्यक्षांची नेमणूक केली नव्हती. आता थेट पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर मुंबईसाठीही अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे.

याशिवाय मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाचा आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मनसे शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन सरदेसाई विभाग अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेतील. मनसेच्या मुंबई शहराध्यक्षांसह तीन उपाध्यक्ष काम करणार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता या जबाबदारी देण्यात आल्या आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!