November 15, 2026 10:13 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » मुलीच्या घरी आई गेली अन नातवाने केला हल्ला !

मुलीच्या घरी आई गेली अन नातवाने केला हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी

शेअर मार्केटमधील कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आपल्याच आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना धरणगाव शहरात गुरूवारी २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या हल्ला वृध्द महिला ही गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल  करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील महाबळ परिसरातील लीलाबाई रघुनाथ विसपुते (वय-७०) या वृध्द महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होत्या. धरणगावात त्याची मुलगी वैशाली विलास पोतदार यांच्याकडे २५ जून रोजी मुक्कामीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, वैशाली पोतदार यांचा मुलगा आरोपी तेजस पोतदार हा त्यांचा लहान मुलगा असून, तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. या गुंतवणुकीमुळे त्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज केले होते. तेजस एक वर्षापूर्वी जळगाव येथे मामाच्या घरीसहा महिने राहिला होता. त्यावेळी देखील काही लोक त्याच्याकडे पैशांच्या मागणीसाठी येत असत. यामुळे आजी लीलाबाई तेजसला नेहमी व्याजाने पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याबद्दल बोलत असत. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होता.

तेजसने आजी झोपेत असतांना तिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून जखमी केले. बाजूलाच कुऱ्हाड ठेवली आणि भाऊ याच्याकडे पळत आला आणि आजीवर कुणीतरी कुऱ्हाडीने हल्ला केला असा बनाव केला. रक्ताच्या थारोळ्या गंभीर अवस्थेत पडलेल्या वृध्द लिलाबाई यांना तातडीने रूग्णवाहिकेतून जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सकाळी झालेल्या वादातून रागाच्या भरात तेजसनेच आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याचे अक्षय पोतदार यांने सांगितले.

गुरूवारी २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तेजस आणि लिलाबाई यांच्यात शेअर मार्केटच्या कर्जावरून पुन्हा मोठा वाद झाला होता. त्यानंतर लीलाबाई बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. त्यावेळी तेजस हा कु-हाड घेवून आल्याचे त्यांचा भाऊ अक्षयने पाहिले होते. त्यावेळी मी पिंपळाचे झाड तोडण्यासाठी जात असल्याचे सांगून तो खाली निघून गेला आणि त्यानंतर अक्षय हा अभ्यास करण्यासाठी त्याच्या खोलीत निघून गेला. याप्रकरणी जखमी लिलाबाई यांच्या मुलाचा मुलगा उमेध धीरेंद्र विसपुते रा. महाबळ याने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी तेजस विलास पोतदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलीसांनी संशयित आरोपी तेजस पोतदार याला अटक केली असून पुढील कारवाईला सुरूवात करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!