September 26, 2026 10:03 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » भरधाव वाहनाच्या धडकेत सांबराचा दुर्देवी मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत सांबराचा दुर्देवी मृत्यू

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील बेलगंगा येथे बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने सांबराला उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या सांबराला धडक देऊन संबंधित वाहनचालक पसार झाला आहे. याबाबतची खबर कळताच परिसरातील सर्पमित्र कुणाल तांबे, सूरज राजपूत, धीरज पाटील यांनी तत्काळ या ठिकाणी डाव घेत या सांबरला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वाचवण्यात अपयश आले. हे सांबर गंभीर जखमी असल्याने तेथेच त्याचा मृत्यू झाला. याच वेळी चाळीसगाव वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले व ते या मृत सांबर घेऊन गेले. दरम्यान, अज्ञात वाहनधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनविभाग करीत आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!