शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘जागतिक परिचारिका दिन’ उत्साहात साजरा
जळगाव : “परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत,” अशा शब्दांत त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘जागतिक परिचारिका दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवार, १२ मे रोजी मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षातर्फे रुग्णालयातील परिचारिका (सिस्टर) व परिचारक (ब्रदर) यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन…