Home » जळगाव » शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘जागतिक परिचारिका दिन’ उत्साहात साजरा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘जागतिक परिचारिका दिन’ उत्साहात साजरा

जळगाव : “परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत,” अशा शब्दांत त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘जागतिक परिचारिका दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवार, १२ मे रोजी मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षातर्फे रुग्णालयातील परिचारिका (सिस्टर) व परिचारक (ब्रदर) यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे जलसंपदा मंत्री Girish Mahajan यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी आमदार Amol Jaware यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधत परिचारिकांना शुभेच्छा दिल्या. “रुग्णसेवेत परिचारिकांचे योगदान अमूल्य असून, कठीण परिस्थितीतही त्या निष्ठेने सेवा बजावत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे आरोग्यदूत पै. शिवाजी पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी संगीता शिंदे (मुख्य अधिसेविका), तुषार पाटील (सहाय्यक अधिसेवक), आशा पाटील (सहाय्यक अधिसेविका), सुलभा नाईक, प्राप्ती भालतिलक, वंदना पारधी, भाग्यश्री ढाकणे, सरिता कोकणी, किरण चौधरी, अक्षय सपकाळ यांच्यासह वरिष्ठ परिचारिका व अधिकारी उपस्थित होते.

रुग्णालयातील व्यस्त कामकाजातून वेळ काढून परिचारिकांचा सन्मान करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णांना मायेचा आधार देत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून सेवा देणाऱ्या ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’च्या वारसदारांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय सहायता कक्षाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *