September 20, 2026 3:51 pm

शिरसोलीत जीर्ण सार्वजनिक शौचालयावरून संताप; ग्रामपंचायत गाढ झोपेत?, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

जळगाव | प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील कुऱ्हाडदे रस्त्यालगत असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, त्यातून दुर्गंधी व अस्वच्छता पसरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. हे जीर्ण शौचालय तात्काळ हटवून अन्य योग्य ठिकाणी नवीन शौचालय उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन […]

जळगावच्या रिंग रोड विकासकामाला अखेर सुरुवात; आमदार राजूमामांच्या प्रयत्नांना यश

जळगाव : जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन रविवारी (२७ जून) बहिणाबाई उद्यानासमोरील परिसरात उत्साहात पार पडले. या विकासकामासाठी आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपा महानगर […]

ब्रेकिंग न्यूज: टीईटीचा पेपर फुटला! २८ जूनची परीक्षा पुढे ढकलली; राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार (२८ जून) रोजी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परीक्षा परिषदेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, शनिवारी (२७ जून) पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी एका ठिकाणी धाड टाकली. […]

संतापजनक! बेवारस मृतदेहाचा घंटागाडीतून अंतिम प्रवास; अमळनेर प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर संताप

अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर शहरात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात आढळलेल्या एका बेवारस मृतदेहाची शवविच्छेदनानंतर दफनविधीसाठी चक्क कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून वाहतूक करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एखाद्या शहराची ओळख केवळ विकासकामांवरून नव्हे, तर प्रशासनाच्या मानवी संवेदनशीलतेवरून ठरत असते. मात्र, अमळनेर ग्रामीण रुग्णालय परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या […]

error: Content is protected !!