जळगाव–म्हसावद रेल्वेमार्गावर उद्या १२ तासांचा ब्लॉक; सहा मेमू रद्द; ९ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जळगाव ते म्हसावददरम्यान रेल्वे वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. जळगाव–शिरसोली–म्हसावद या रेल्वेमार्गावर अप आणि डाऊन दोन्ही दिशांना स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ८ सप्टेंबरला तब्बल १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून […]
ब्रेकिंग न्यूज: वसंतवाडी तांड्यात धक्कादायक घटना! सोलर पॅनल कोसळून चिमुकला जखमी; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

जळगाव प्रतिनिधी दि.७ : वसंतवाडी तांडा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात आलेले सोलर पॅनल अचानक कोसळल्याने परिसरात खेळत असलेला सहा वर्षीय चिमुकला जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेत विराट प्रकाश राठोड (वय ६ वर्षे) याच्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सोलर पॅनलखाली अडकले दोन्ही पाय […]