भादली बु.: जळगाव महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भादली बु. येथे विद्यार्थ्यांसाठी समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. “संकल्प शिक्षणाचा, आनंद विद्यार्थ्यांचा” या उपक्रमांतर्गत महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या तब्बल ५०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम भाजपा खंडेरावनगर मंडळाचे (जळगाव ग्रामीण) तालुकाध्यक्ष, कृउबा संचालक व भादली बु. माजी सरपंच मिलिंद दत्तात्रय चौधरी तसेच माजी पंचायत समिती सदस्या व भाजपा महिला मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्षा सौ. जागृती मिलिंद चौधरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र चौधरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जळगाव जिल्हा पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, “गिरीषभाऊंच्या वाढदिवसानिमित्त कोणताही वायफळ खर्च न करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठी असा उपक्रम राबविणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे,” असे सांगितले.
यावेळी जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपा सरचिटणीस राजेंद्र सोनवणे, विद्यालयाचे सचिव उमाकांत जावळे, भाजपा पदाधिकारी संजय भोळे, अरुण सपकाळे, लखीचंद कोळी, भूषण बाविस्कर, सुदाम राजपूत, योगेश पाटील, नामदेव कोळी, भादलीचे सरपंच मनोज चौधरी, किशोर चौधरी (असोदा), शिवसेना पदाधिकारी भूषण पाटील, संदीप कोळी, हितेश नारखेडे, प्रवीण खडसे, किशोर कोळी, कडू कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राध्यापक गाजरे सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. मोफत शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, प्राध्यापक गाजरे सर, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Author: K P Chavan
thepubliclive


