जळगाव : प्रतिनिधी
भाच्याच्या पायावरुन दुचाकी चाक गेल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोघांनी राहूल राजू सोनवणे याला बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील कोयत्याने राहूल सोनवणेच्या पाठीवर आणि खांद्यावर वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. ३० रोजी सकाळी महाबळ परिसरातील साई विहार अपार्टमेंटजवळ घडली. याप्रकरणी तिघांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरततील समता नगरातील वंजारी टेकडीजवह सविता मुकेश सोनवणे या वास्तव्यास आहे. दि. ३० रोजी त्यांचा भाचा राहुल सोनवणे हा रस्त्यावर उभा असतांना, बंडू उर्फ राजेश दिनेश परदेशी याने त्याची दुचाकी राहुलच्या पायावरुन नेली. सविता सोनवणे यांनी त्याचा जाब विचारला असता, त्याचा राग आल्याने बंडू उर्फ राजेश परदेशी, रोहीत परदेशी, नितीन सोनवणे व गणेश बुधा सोनवणे यांनी त्याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर गणेश सोनवणे याने त्याच्या हातातील कोयता हा उलटा राहूलच्या पाठीवर आणि खांद्यावर मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी सविता सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.
.



