Home » जळगाव » तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी केली अटक

तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी केली अटक

जळगाव : प्रतिनिधी

हमालीच्या कामासाठी जात असतांना दोन तरुणांनी दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांना पैसे न दिल्याने हमाली कामाच्या हुकाने सूरज उर्फ विशाल अनिल सोनवणे (वय ३७, रा. जूने जळगाव) या तरुणाच्या डोळ्यावर वार करुन जखमी केले. ही घटना दि. १३ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास आंबेडकर नगराजवळील पुलावर घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुनहा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जूने जळगावात राहणारा सूजर उर्फ विशाल अनिल सोनवणे (वय ३७) हा तरुण हमाली काम करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. दि. १३ रोजी रात्री दीड वाजेचया सुमारास तो हमालीचे काम करण्यासाठी धान्य मार्केटमध्ये जात होते. यावेळी आंबेडकर नगराच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यावरील पुलावर त्याला सोमेश ज्ञानेश्वर सोनवणे व राहुल रविंद्र कोळी हे दोघे भेटले. त्यांनी सूरजकडे दारु पिण्यासाठी जबरदस्ती पैसे मागितले. त्यांना पैसे दिले नाही म्हणून त्यांनी सूरज सोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

दोघांनी वाद घालीत सूरज जवळ हमाली कामाकरीता लागणारा हुकाने त्याच्या डोळ्यावर वार केले. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांनी कोणाला आमचे नाव सांगितल्यास जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. मारहाणीत जखमी झालेल्या सूरज उर्फ विशाल सोनवणे याने दुसऱ्या दिवशी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सोमेश ज्ञानेश्वर सोनवणे व राहुल रविंद्र कोळी (दोध रा. मेस्कोमाता नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *