September 21, 2026 11:34 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » जळगावात शिविगाळचा जाब विचारल्याने तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न !

जळगावात शिविगाळचा जाब विचारल्याने तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न !

जळगाव : प्रतिनिधी

शिवीगाळ करण्याविषयी जाब विचारल्याने विक्की मंगल कोळी (२६, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्यावर गोविंदा वामन आंबेकर याने तलवार व कुन्हाडीने वार करण्याचा प्रयत्न करीत धमकी दिली. त्यानंतर पळून जात असताना तो गटारीत पडल्याने त्याला दुखापत झाली. ही घटना १६ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आंबेकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर कॉलनीतील मंगळपुरी नगरात राहणारे विक्की कोळी यांच्या घरासमोर गोविंदा आंबेकर याने येऊन शिवीगाळ केली. त्याविषयी त्याला जाब विचारला असता त्याने मारहाण केली. विक्की यांच्या वडिलांनी सुटका केली, मात्र गोविंदा याने तलवार व कुन्हाड घेऊन तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याच्याजवळील शस्त्रे घेतली. त्यानंतर तो पळून जाताना गटारीत पडल्याने त्याच्या पायाला व डोक्याला मार लागला. त्याच्याकडे स्कूल बॅग, गॅस सिलिंडर असे साहित्यदेखील होते. या प्रकरणी कोळी यांच्या फिर्यादीवरून गोविंदा आंबेकर याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!