November 8, 2026 12:00 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात
लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात
Home » Uncategorized » पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नका

पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नका

आजचे राशिभविष्य दि.१९ एप्रिल २०२५

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे; परंतु अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेवूनच निर्णय घ्‍या. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, काम करत रहा. ध्यान आणि चिंतनात थोडा वेळ व्‍यतित करा. घरातील ज्येष्ठ सदस्यांचा सन्मान आणि आरोग्याचा आदर करा.

वृषभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आज आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाल. प्रलंबित सरकारी काम प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होण्‍याची शक्‍यता आहे., पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नका. मुलांमध्ये कोणत्याही नकारात्मक कृतीबद्दल जाणून घेणे निराशाजनक असेल. शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील.

मिथुन राशी

अति व्‍यस्‍ततेतही कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. काही महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घेण्यातही मदत कराल. तरुणांना त्यांच्या करिअर परीक्षेत सकारात्मक निकाल मिळू शकतात. कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका आहे, त्यामुळे हिशेब काळजीपूर्वक करा. व्यवसायात कामाचा अतिरिक्‍त दबाव असेल.

कर्क राशी

श्रीगणेश म्‍हणतात, ग्रहमान चांगले आहे. आर्थिक नियोजनाशी संबंधित कोणतेही ध्येय सहजपणे पूर्ण होईल. धार्मिक संस्थांमध्ये तुमचे निःस्वार्थ योगदान तुमची प्रतिष्ठा वाढवेल. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीला शांतपणे तोंड द्या. राग आणि आक्रमकता परिस्थिती आणखी बिकट करू शकते. मुलांना प्रवेशाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसाय क्षेत्रातील सर्व निर्णय स्वतः घ्यावे लागतील.

सिंह राशी

आज तुमच्‍या प्रतिभेला चालना मिळेल. घरात काही बदल किंवा सुधारणा करण्याचे नियोजन करत असाल तर वेळ योग्य आहे. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. तरुणांनी नकारात्मक आणि चुकीच्या कामांपासून दूर रहावे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. घरातील वातावरण आनंदी असेल.

कन्या राशी

श्रीगणेश सांगतात की, आज मित्रांसह कुटुंबाबरोबर वेळ व्‍यतित कराल. वेळ आनंदाने आणि मनोरंजनाने भरलेला असेल. मुलांचे प्रश्न एकमेकांशी सल्लामसलत करून सोडवता येतील. विद्यार्थी आणि तरुणांचे ध्येयांकडे दुर्लक्ष झाल्‍याने कामात अडथळा येऊ शकतो. भावंडांशी असलेले वाद मोठ्या सदस्याच्या मदतीने सोडवता येतात. कामाच्या ठिकाणी केलेले बदल सकारात्मक परिणाम देऊ शकतात. घरातील वातावरण आनंदी राहिल.

तुळ राशी

कोणत्याही अडचणीच्या बाबतीत, नातेवाईकांचा पाठिंबा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. सकारात्मक बदल घडतील. सततच्या अशांततेतूनही आराम मिळेल. उत्पन्नाचे स्रोत कमी होतील;पण लवकरच परिस्थिती अनुकूल होईल. या टप्प्यावर, तुमची ऊर्जा संपर्कक्षेत्र विस्तारण्यासाठी वापरा. ​​

वृश्चिक राशी

श्रीगणेश सांगतात की, आज दिवसाची सुरुवात प्रसन्‍न होईल. संपर्कांचा फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या योग्यरित्या हाताळल. जवळच्या व्यक्तीसोबत एखादी अप्रिय घटना घडू शकते. यामुळे मन थोडे निराश होऊ शकते. वेळेनुसार तुमच्या वर्तनात बदल आणणे महत्वाचे आहे. कला, प्रकाशन इत्यादी क्षेत्रात चांगले यश मिळेल.

धनु राशी

वेळ अनुकूल आहे. दिवसाच्या सुरुवातीपासूनच तुमच्या महत्त्वाच्या कामांचे नियोजन सुरू करा. इतरांकडून मदतीची अपेक्षा करण्याऐवजी; तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर अवलंबून रहा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. नवीन कार्ये योग्यरित्या अंमलात आणा. पैशाशी संबंधित काही गुंतवणूक करताना घाई आणि निष्काळजीपणामुळे नुकसान होवू शकते. तुमच्या व्यवहारात लवचिकता ठेवा. थकवा आणि नकारात्मकतेमुळे मनोबल कमी होऊ शकते.

मकर राशी

श्रीगणेश सांगतात की, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यात आज व्‍यस्‍त असाल. धार्मिक स्थळालाही जाण्‍याचा योग आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य विचारमंथन आवश्यक आहे. महत्त्‍वाचे करार करताना कागदपत्रे वाचल्याशिवाय निर्णय घेवू नका. व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील.

कुंभ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, घराशी संबंधित आवश्यक वस्तूंच्या खरेदीवर वेळ घालवला जाईल. तुमच्या सकारात्मक आणि सहाय्यक वृत्तीमुळे तुम्हाला समाजात आणि कुटुंबात आदर मिळेल. तरुणांनी त्यांच्या ध्येयासाठी कठोर परिश्रम केले तर निश्चितच यश मिळेल. इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करू नका.

मीन राशी

श्रीगणेश सांगतात की, ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्‍नशील असाल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण केल्याने मानसिक शांतता लाभेल. आर्थिक समस्या उद्भवू शकतात. एखाद्याच्या नकारात्मक कृतीमुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या असुरक्षित होऊ शकता. म्हणून इतरांपासून अंतर ठेवा. काम करण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल करा. दिवसभराच्या थकव्यापासून मुक्त होण्यासाठी कुटुंबासोबत थोडा वेळ व्‍यतित करा.

 

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!